केसांमधील उवा होतील चुटकीसरशी गायब, वापरा ‘या’ महत्त्वाच्या टिप्स

अनेकदा केसात झालेल्या उवा आणि लिखा या चारचौघात आपल्याला लाज आणतात. उवा केवळ टाळूलाच नुकसान करत नाहीत तर केसांची मुळे कमकुवत करतात आणि केस गळतात. परंतु आपण काही घरगुती उपाय करुन फक्त एका आठवड्यात सर्व उवा नष्ट करू शकता.

तुळशीच्या पानात दडलाय आरोग्याचा खजिना, वाचा

कडुलिंबाचे तेल

कडुलिंबामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि परजीवीविरोधी गुणधर्म आहेत.

झोपण्यापूर्वी तुमच्या टाळूवर कडुलिंबाचे तेल हलके मालिश करा.

सकाळी सौम्य शाम्पूने धुवा.

नियमित वापरामुळे उवा नष्ट होतात. म्हणूनच केसांची काळजी घेण्यासाठी हा सर्वात प्रभावी उपाय मानला जातो.

दररोज एक पेरू खाण्याचे ‘हे’ आहेत खास फायदे, जाणून घ्या

व्हिनेगर आणि पाण्याचे द्रावण

व्हिनेगर उवांची अंडी काढून टाकण्यास मदत करते.

अर्धा कप पाण्यात एक कप व्हिनेगर मिसळा आणि ते केसांच्या मुळाशी लावा.

३० मिनिटांनंतर, कंगव्याने विंचरा.

पोटात गॅस झाल्यावर फक्त एक चिमूटभर हा मसाल्यातील पदार्थ आहे गरजेचा, वाचा

नारळ तेल आणि कापूर

नारळाचे तेल केवळ केसांना पोषण देत नाही तर उवा मारण्यास देखील मदत करते.
२ चमचे नारळाच्या तेलात थोडे कापूर मिसळा.

हे मिश्रण केसांच्या मुळाशी लावावे. रात्रभर तसेच राहू द्या.

सकाळी केस धुवा.

या उपायाचा नियमित वापर केल्याने उवांवर लवकर उपचार होण्यास मदत होते.

उवांपासून बचाव करण्यासाठी केवळ उपचारच नाही तर खबरदारी देखील आवश्यक आहे.

उशाचे कव्हर, टॉवेल आणि कंगवा दररोज धुवा आणि वापरा.

मुलांना शाळेत किंवा बाहेर इतरांचे कंगवले, टोप्या किंवा टॉवेल वापरण्यापासून परावृत्त करा.

यामुळे उवा पसरण्याचा धोका कमी होतो.