
चेहऱ्यावर हसू असणे हे आपल्या प्रत्येकाच्या दृष्टीने खूप गरजेचे आहे. खऱ्या अर्थाने हास्य हे चेहऱ्याचे सौंदर्य आहे. पण जर तुमचे दात पिवळे दिसले तर मात्र हसताना आपल्याला खूप लाज वाटते. म्हणूनच लोक पांढरे आणि चमकदार दात मिळविण्यासाठी विविध टूथपेस्ट आणि महागड्या उपचारांचा अवलंब करतात. पण तुम्हाला माहित आहे का, आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेले मीठ आणि लिंबू तुमच्या दातांवरील पिवळा थर काढून टाकण्यासाठी प्रभावी ठरतात.
मीठ आणि लिंबू प्रभावी का आहेत?
मीठात एक नैसर्गिक क्लिनिंग एजंट असतो जो दातांवरील प्लेक आणि पिवळे साठे काढून टाकण्यास मदत करतो.
लिंबूमधील सायट्रिक अॅसिड दातांवरील घाण आणि डाग साफ करते आणि त्यांना चमक देते.
दोघांचे मिश्रण दातांवर नैसर्गिक पांढरेपणा आणतो.
मीठ आणि लिंबूने दात कसे स्वच्छ करावे?
एका लहान भांड्यात अर्धा चमचा मीठ घ्या.
त्यात ताज्या लिंबाच्या रसाचे काही थेंब घाला.
तुमच्या बोटाने किंवा ब्रशने ही पेस्ट तुमच्या दातांवर हळूवारपणे घासून घ्या.
सुमारे २-३ मिनिटे मालिश करा आणि नंतर स्वच्छ पाण्याने तोंड स्वच्छ धुवा.
आठवड्यातून २-३ वेळा याचा वापर केल्याने दातांचा पिवळापणा हळूहळू कमी होतो.
वापरताना काय खबरदारी घ्याल?
लिंबूमध्ये आम्लाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे दररोज वापरल्याने दातांच्या वरची लेअर खराब होऊ शकते.
नेहमी हलक्या हाताने दात घासावे, नाहीतर हिरड्यांना इजा होण्याची भीती असते.
दातांच्या कोणत्याही समस्या असतील (पोकळी किंवा सुजलेल्या हिरड्या), तर हा उपाय वापरण्यापूर्वी दंतवैद्याचा सल्ला घ्या.
बेकिंग सोडा आणि पाण्याच्या पेस्टने दात स्वच्छ केल्याने पिवळेपणा कमी होतो.
मीठ मिसळून मोहरीच्या तेलाने मालिश केल्याने दातांची चमक देखील सुधारते.
तुळस आणि कडुलिंबाच्या पानांचा वापर केल्याने दात निरोगी आणि चमकदार राहण्यास मदत होते.































































