
मणिपूरमधील बिष्णूपूर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी अज्ञात हल्लेखोरांनी आसाम रायफल्सच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात दोन जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात सात जवान जखमी झाल्याचे समजते.
33 आसाम रायफल्सचे जवान इंफाळवरून बिष्णूपूर येथे जात असताना संध्याकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार झाला. या गोळीबारात जखमी झालेल्या जवानांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर सदर परिसरात शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे.