आता एकाच लॉगइनवर पीएफचे पासबुक, ‘पासबुक लाइट’ फीचर लाँच; फक्त क्लिक करा आणि सर्व माहिती मिळवा

कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) सात कोटींहून अधिक सदस्यांसाठी ‘पासबुक लाइट’ फीचर उपलब्ध करून दिले आहे. या फीचरच्या माध्यमातून ईपीएफओ सदस्य आपले पासबुक थेट पोर्टलवर बघू शकतील. त्यासाठी वेगळ्या पासबुक पोर्टलवर लॉगइन करण्याची गरज नाही. एकाच क्लिकवर एकाच लॉगइनद्वारे खात्याची सर्व माहिती मिळणार आहे. आतापर्यंत पासबुक पोर्टलवर स्वतंत्र लॉगइन करून योगदान व पैसे काढण्याचा तपशील पाहावा लागत होता, परंतु नवीन ‘पासबुक लाइट’ फीचरमुळे योगदान, शिल्लक आणि पैसे काढण्याचे संक्षिप्त तपशील एकाच पोर्टलवर पाहता येतील, अशी माहिती केंद्रीय कामगारमंत्री मनुसख मांडविया यांनी दिली.

पीएफ ट्रान्सफर, सेटलमेंट झाली सोपी

आतापर्यंत ईपीएफ सदस्य नोकरी बदलल्यानंतर ऑनलाइन फॉर्म 13 च्या माध्यमातून नवीन खाते ट्रान्सफर करत. त्यानंतर जुन्या ऑफिसमध्ये पीएफ ट्रान्सफर सर्टिफिकेट तयार व्हायचे. मात्र आता पीएफ ट्रान्सफर सर्टिफिकेट थेट पीडीएफ फॉर्मेटमध्ये सदस्यांना डाऊनलोड करता येईल. पूर्वी ऍडव्हान्स, रिफंड, ट्रान्सफर किंवा व्याज समायोजन यांसारख्या सेवांसाठी उच्च अधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक होती, ज्यामध्ये अधिक वेळ जात होता.

काय आहे पासबुक लाइट’?

l मेंबर पोर्टलवर तुम्हाला पासबुक थेट दिसेल.

l पासबुक पोर्टलवर जाऊन लॉगइन करण्याची गरज नाही.

l तुमचे योगदान, काढलेली रक्कम, शिल्लक यांची माहिती एका जागी.

l ट्रान्सफर ऑप्लिकेशनची स्थिती ऑनलाइन ट्रक करण्याची सुविधा.