स्कूबा डायव्हिंग करताना गायक झुबीन गर्ग यांचा मृत्यू

‘गँगस्टर’ या चित्रपटातील ‘या अली’ गाण्यामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेले प्रसिद्ध बॉलिवूड गायक झुबीन गर्ग यांचे सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना मृत्यू झाला. ते 52 वर्षांचे होते. 20 आणि 21 सप्टेंबर रोजी नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करण्यासाठी ते सिंगापूरमध्ये गेले होते.

नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलचे प्रतिनिधी अनुज कुमार बोरुआ यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कूबा डायव्हिंग करताना झुबीन यांना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि त्यांना ताबडतोब सीपीआर देण्यात आला. त्यानंतर त्यांना सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.