33 लाखांचा गुटखा, तंबाखू साठा जप्त

गुटखा, सुगंधी तंबाखू व पान मसाल्याचा मोठय़ा प्रमाणात साठा करून तो विक्री करण्याच्या प्रयत्नात असताना गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने गुटखा तस्करांना दणका दिला. या कक्षाने माहीम येथील पाच गाळयांवर छापेमारी करून तब्बल 32 लाख 99 हजार रुपये किमतीचा हा साठा जप्त केला. धारावी येथील बनवारी कंपाऊंडमध्ये पाच गोदामात गुटखा, सुगंधी तंबाखू व पान मसाल्याचा साठा करून ठेवला होता. प्रभारी निरीक्षक मंगेश देसाई, निरीक्षक जितेंद्र भारती तसेच संतोष पवार, सचिन जाधव, प्रताप बंडगर यांच्यासह पोळ, करपाते, गाढवे, कोळेकर व मुकुंदे या पथकाने त्या गोदामांवर छापे टाकले. पोलीस अस्लम शेख आणि कलिम अहमद या दोघांचा शोध घेत आहेत.