आधारकार्डात खोटी माहिती दिल्यास 3 वर्षांचा तुरुंगवास

आधार बनवताना जाणूनबुजून खोटी माहिती सादर केली, तर गंभीर गुन्हा मानला जाईल यासाठी 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा 10हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. त्यामुळे आधार कार्डसाठी अर्ज करताना नेहमी सत्य आणि योग्य कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे. एखाद्या व्यक्तीच्या आधार कार्डच्या माहितीत किंवा ओळखपत्रात बदल करणे किंवा छेडछाड करणे हा कायद्याने गुन्हा आहे. असे केल्यास 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा 10 हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो, असे आदेश यूआयडीएआयने जारी केले आहेत. त्यामुळे, कोणत्याही व्यक्तीच्या परवानगीशिवाय त्याच्या आधार कार्डमध्ये कोणताही बदल करू नये. काही वेळा लोक यूआयडीएआयची परवानगी न घेता आधार कार्डशी संबंधित एजन्सी उघडतात आणि लोकांची खासगी माहिती गोळा करतात. हे करणे कायद्याने गुन्हा आहे.