‘जॉली एलएलबी 3’ ला प्रेक्षकांची पसंती दोन दिवसांत 32 कोटींचे कलेक्शन

अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या ‘जॉली एलएलबी 3’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘सॅकनिल्क’च्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने पहिल्या दिवशी 12.75 कोटी आणि दुसऱया दिवशी शनिवारी 20 कोटी कमावले. त्यामुळे ‘जॉली एलएलबी 3’ चा एकूण व्यवसाय 32.75 कोटी झाला आहे. या आठवडय़ात चित्रटाची कमाई झाली आहे.