ट्रेंड – पालेभाजी खाताय?

हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात असं आपल्याला डॉक्टरांकडून सांगितलं जातं. ते चुकीचं आहे असं नाही. मात्र, ती पालेभाजी कुठून आणि कशी येते? शेतापासून आपल्याकडं पोहोचेपर्यंत तिच्यावर काय प्रक्रिया होतात यावर बरंच काही अवलंबून असतं. पावसाळ्यात पालेभाज्या खाणं टाळावं किंवा काळजी घ्यावी असंही सांगितलं जातं. मात्र, सोशल मीडियात सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही पावसाळ्यात काय उन्हाळ्यातही भाजी खायचे धाडस करणार नाही. या व्हिडिओत एक इसम पूर्ण सुकून गेलेली एक पालेभाजी कसल्याशा केमिकलच्या पाण्यात भिजवताना दिसतोय. त्यानंतर ती भाजी टवटवीत होत असल्याचे दिसते. साहजिकच ही टवटवीत भाजी ताजी म्हणून सहज विकली जाते. हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. हा व्हिडिओ https://tinyurl.com/mrscae2z या लिंकवर पाहता येईल.