Ratnagiri News – आंबा बागायतदार आक्रमक, मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार

हवामानातील बदल आणि अवकाळी पावसामुळे दरवर्षी संकटात सापडणारा कोकणातील आंबा बागायतदार मदतीसाठी सरकारचे दरवाजे ठोठावत आहे. कोकणातील हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था उद्या 23 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहे.

मंगळवारी होणाऱ्या धरणे आंदोलनात आंबा बागायतदारांनी आपल्या मागण्यांचा पुनरूच्चार करणार आहेत. यामध्ये 2015 पासूनची आंबा बागायतदार आणि रत्नागिरीतील शेतकऱ्यांची कर्ज सरसकट आणि विनाअट माफ करावी. या कालावधीत ज्या शेतकऱ्यांकडून बॅंकांनी जबरदस्तीने कर्ज वसूल केली आहेत त्यांना ती रक्कम परत करावी,पुर्नगठण कर्जावरील व्याजाच्या रक्कमा कोणत्याही अटीशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून सरकारने आपला व्याजमाफीचा शब्द पाळावा.यंदाच्या हंगामात अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदाराचे प्रचंड नुकसान झाले त्यामुळे बागायतदारांना सरकारने नुकसानभरपाई द्यावी.पीकविम्याचा कोकणातील शेतकऱ्यांना फायदा मिळत नाही त्यामुळे पीकविम्याचे निकष बदलावेत.कोकणातील फळझाडे कायमस्वरूपी असतात त्यामुळे कोकणातील फळझाडांना ई-पीक पहाणी अट रद्द करावी.महावितरणच्या स्मार्ट मीटरमुळे दुप्पट बील येत आहे त्यामुळे स्मार्ट मीटर बसवू नयेत.माकड आणि अन्य वन्य प्राण्यापासून शेतीचे नुकसान होत आहे अशावेळी सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या सर्व मागण्या आंदोलनात करण्यात येणार आहेत.

.