
ऍपल कंपनीने नुकतीच आयफोन 17 सीरिज लाँच केली आहे. आयफोन 17 खरेदीसाठी मुंबई, दिल्लीत झुंबड उडाली आहे. हजारो आयफोन चाहत्यांनी फोन खरेदी केला आहे.
ऑनलाइन आयफोन खरेदी केला आणि तुम्हाला जर चुकून क्रॅच झालेला आयफोन मिळाला तर ज्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून फोन खरेदी केला आहे, त्या प्लॅटफॉर्मवर माहिती द्या.
जर तुम्ही ऍपल स्टोअरवर जाऊन फोन खरेदी केला असेल तर तेथे जाऊन विक्रेत्यांशी संपर्क साधा. फोन बदलून देण्याची विनंती करा. तुम्हाला फोन बदलून मिळेल.
ज्या ठिकाणाहून फोन खरेदी केला आहे, त्या वेबसाईटच्या अटी व नियम तपासा. जर तुम्हाला फोन बदलून दिला नाही, तर तुम्ही ग्राहक मंचाकडे तक्रार करू शकता.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऑनलाइन फोन खरेदी केला असेल तर डिलिव्हरी बॉयकडून फोन घेताना काळजी घ्या. तो तुम्हाला पॅकिंग फोन देत आहे ना याची काळजी घ्या.