
अनेक गुंतवणूकदारांची तब्बल 377 कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणातील आरोपीचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळून लावला.
दुपटीने नफा देण्याचे आमिष दाखवून कोटय़वधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संदीप सामंतला अटक झाली आहे. त्याने जामिनासाठी केलेल्या अर्जावर न्या. डॉ. नीला गोखले यांच्या एकल पीठासमोर यावर सुनावणी झाली. ही फसवणूक 377 कोटी रुपयांची आहे, असे प्रतिज्ञापत्र ठाणे ईओडब्ल्यूने सादर केले. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने सामंतला जामीन नाकारला.
अटकेत दोष नाही
पोलिसांनी 16 मार्च 2023 रोजी सामंतला अटक केली. अटक करण्याआधी दोन वेळा त्याला समन्स बजावण्यात आले होते. तसेच अटकेची कारणेही सांगण्यात आली होती. त्यामुळे या अटकेत काहीच दोष नाही, असे न्यायालयाने नमूद केले.