
कसोटी क्रिकेटमध्ये संधीच्या प्रतीक्षेत असलेला हिंदुस्थानचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने अचानक कसोटी क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने याबाबत निवड समितीचे अध्यक्ष अजित अगरकर यांना पत्र लिहून कळवले आहे.
मंगळवारी ‘ऑस्ट्रेलिया अ’विरुद्ध सुरू झालेल्या दुसऱ्या अनौपचारिक कसोटीत अय्यरने ‘हिंदुस्थान अ’ संघाच्या कर्णधारपदावरून माघार घेतली. आता त्या जागी ध्रुव जुरेलच्या हातात ग्लोव्हज्सह संघाचे नेतृत्व सोपवण्यात आलं आहे.
पाठीच्या समस्येमुळे माघार
पाठदुखीने त्रस्त अय्यर हा सध्या प्रथम श्रेणी व कसोटी क्रिकेट खेळण्याच्या स्थितीत नसल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. तो मुंबईला परतला असून, त्याने निवड समितीला स्वतःची असमर्थता कळवली आहे. वेस्ट इंडीज मालिकेत सहभाग संदिग्ध
या ब्रेकमुळे अय्यर पुढील महिन्याच्या सुरुवातीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.