
लातूर जिल्हा महाराष्ट्रात दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. लातूर शहरात रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागला होता. दर तीन वर्षांनी दुष्काळाचा सामना करावा लागतो. वातावरण बदलाचा परिणाम म्हणून कधी अति पाऊस पडत आहे, कधी बर्फ पडतोय तर कधी पाऊसच पडत नाही. या वर्षी लवकर पाऊस सुरू झाला. नदी, नाले तुडुंब वाहिले. पावसामुळे अनेक मार्गावरील रस्ते वाहतूक बंद पडली होती. मात्र पावसाचा जोर कायम राहिला आणि पूर परिस्थिती निर्माण झाली.