
जनकल्याण सहकारी बॅंक व ईशा नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर उद्या गुरुवारी सकाळी 10 ते 2 या वेळेत दादर पश्चिम, राम मारुती रोडवरील मातृछाया बिल्डिंगच्या तळमजल्यावर होणार आहे. महात्मा ज्योतीराव फुले योजने अंतर्गत रेटीना, तिरळेपणा आणि लहान मुलांच्या डोळ्यांच्या आजारावर मोफत उपचार तसेच सर्व मेडिक्लेम व कॅशलेस सुविधा उपलब्ध असणार आहे.




























































