Photo – उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर; लातूरच्या कडगाव येथे अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी, शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अतिवृष्टी झालेल्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत.

गुरुवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास उद्धव ठाकरे लातूर विमानतळावर दाखल झाले आणि लगेचच अतिवृष्टी झालेल्या भागाच्या पाहणीसाठी रवाना झाले.

लातूर जिल्ह्यातील कडगाव येथे अतिवृष्टी झालेल्या भागाची उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली तसेच शेतकरी बांधवांसोबत संवाद साधला, त्यांची व्यथा जाणून घेतली.

उभं पीक पाण्याखाली गेलंय आणि शेतीच्या बांधावरून बळीराजा मदतीसाठी सरकारकडे आक्रोश करतोय पण सरकार मात्र मदतीची कोणतीच ठोस शाश्वती देत नाहीय, अशावेळी बळीराजाने करायचं काय?

या दौऱ्यादरम्यान शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार अमित देशमुख, आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी उपस्थित होते.