
मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे अनेक गावे पूरग्रस्त झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील या अस्मानी संकटात ‘लालबागचा राजा’ शेतकऱ्यांच्या मदतीला धावला आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी 50 लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली.