
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष मुक्तता झालेल्या लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना लष्कराने कर्नलपदी बढती दिली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात प्रज्ञासिंह ठाकूर, प्रसाद पुरोहित यांच्यासह अन्य आरोपींची पुराव्यांअभावी एनआयए विशेष कोर्टाने दोन महिन्यांपूर्वी निर्दोष मुक्तता केली आहे.
‘एनआयए’च्या विशेष न्यायालयाने 31 जुलै 2025 रोजी प्रसाद पुरोहित यांची मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर लष्कराने केवळ दोन महिन्यांत त्यांना प्रमोशन दिले असून त्यांची कर्नलपदी नियुक्ती केली आहे. पदोन्नतीसाठी आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, असे लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले आहे.