
सुंठ हे कंद ओले असते तेव्हा त्याला आलं, अदरक असे म्हणतात. तोच कंद वाळला असता त्याला सुंठ म्हणतात. दोन्ही मूलत: एकच असले तरी दोघांच्या गुणधर्मात खूप फरक आहे. आलं हे कटु, उष्ण असल्याने कफाचा नाश करणारे आहे. म्हणून पावसाळ्यात, हिवाळ्यात सुंठेचा वापर मुद्दाम जास्त करावा.
एरंडेल तेल की खोबरेल तेल? त्वचेसाठी कोणते तेल सर्वात उत्तम, वाचा
आलं हे अग्निदीपक आहे. भूक लागत नसेल, अजीर्ण झाले, तोंडाला चव नसेल तर आले द्यावे. जेवणापूर्वी 1/2 तास अगोदर आल्याचा तुकडा मिठासोबत खावा किंवा आल्याचा रस एक चमचा आणि थोडेसे काळे मीठ टाकून घ्यावे. यामुळे भूक लागते.
सुंठ खाण्याचे फायदे
सुंठीवाचून खोकला गेला’ ही म्हणं असली तरी खरोखरचा खोकला हा सुंठीशिवाय जात नाही हेच त्यातून स्पष्ट होते.
आल्याचा कंद वाळला असता त्याला सुंठ म्हणतात. सुंठ ही कटू, लघु, तीक्ष्ण, स्गिन्ध असली तरी शरीरावर तिचा परिणाम मधुर विपाकामुळे होतो. मधुर असल्यामुळे तिचा वापर दौर्बल्यात होतो.
अशक्त व्यक्तींना किंवा बाळंतपणामुळे आलेल्या अशक्तपणात सुंठीचा शिरा देतात. चांगल्या तुपात भाजून साखर टाकून केलेला हा शिरा बलवृद्धी करतो. यामुळे आम्लपित्तसुद्धा कमी होते.
सुंठ पावडर रात्रभर एरंडेल तेलात भिजवावी. सकाळी हे सर्व मिश्रण पीठात टाकून त्याच्या पोळ्या खायला द्याव्या. यामुळे आमवात निश्चितपणे कमी होतो.
सुंठ खोकल्यावरील रामबाण औषध आहे. सुंठीची काळी राख किंवा सुंठ पावडर मधासोबत दिल्याने खोकला कमी होतो. तसेच पडसे असताना सुंठ, दालचिनी व खडीसाखरेचा काढा करून द्यावा.
खोकला व पडशामुळे डोके दुखत असेल तर सुंठ पावडरचा गरम लेप डोक्यावर व छातीवर लावावा. याने डोकेदुखी थांबते व खोकलाही कमी होतो.
सुंठीचे अनेक फायदे असले तरी सुंठ ही पित्ताचे व त्वचेचे विकार असणाऱ्यांनी खाऊ नये. तसेच सुंठ उष्ण असल्यामुळे उन्हाळ्यातही खाऊ नये.