हे करून पहा – डोळा फडफड करत असेल तर…

कधी कधी अचानक डावा किंवा उजवा डोळा फडफड करतो. असे झाले तर काही तरी अवकृपा होईल, अशीही भीती व्यक्त केली जाते, परंतु डोळे फडफड होणे ही एक सामान्य समस्या आहे. बऱ्याचदा अपुऱ्या झोपेमुळे ही समस्या उद्भवते. त्यामुळे दररोज किमान 7 ते 8 तास निवांत झोप घ्या.

डोळ्यांवर जास्त ताण येणार नाही, याची नेहमी काळजी घ्या. यासाठी आठवडय़ातून किंवा महिन्यातून एकदा ध्यानधारणा करा. नियमित व्यायाम करा. दररोज संतुलित आहार घ्या. पॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे डोळे फडफडू शकतात. त्यासाठी जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्या खा, फळे खा. डोळ्यांची स्वच्छता राखा. मोबाइल स्क्रीन टाइम कमी करा.