Rain Alert : मुसळधार! मुंबई, ठाण्याला रविवारी पावसाचा रेड अलर्ट

रविवारी 28 सप्टेंबर रोजी हवामान खात्याने मुंबई, ठाणे, रायगड, पालघरला पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या चार जिल्ह्यांमध्ये रविवारी विजांचा कडकडाट व जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडणार आहे. या व्यतिरिक्त नाशिक व पुण्यातील घाट परिसरातही रेड अलर्ट देण्यात आला आहे.

सध्या नवरात्रीची धूम सुरू असतानाच पावसाने देखील मुंबईकरांच्या गरब्यावर विरजण घातलं आहे. शनिवार रविवार विकेंड निमित्ताने गरबा खेळायला जायची तयारी केलेल्या मुंबईकरांचा गरबा चिखलात होणार असे दिसतेय.

अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, पालिकेचे आवाहन

हवामान खात्याने मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने नागरिकांना अत्यावश्यक असेल तरच नाघराबाहेर पडावे, असे आवाहन केले आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.