बोटांची नखे वाढवण्यासाठी…

लांब नखांमुळे हात आणखी सुंदर दिसतो असे काहींना वाटते. मग त्यासाठी प्रयत्न केले जातात. परंतु, नखे वाढवताना काही विशेष काळजीही घ्यावी लागते.

नखे वाढवायची असतील तर योग्य आहार घ्या.

व्हिटॅमिन बी 7 असलेले पदार्थ म्हणजेच धान्य, अंडी, केळी आणि मशरूम जास्तीत जास्त खा.

नखे वाढल्यानंतर त्याला दाताखाली ठेवून चावू नका. असे केल्याने नखे कमकुवत होतात. त्याची वाढ थांबते.

हातांना आणि नखांना मॉइश्चरायझर लावा. यामुळे नखे कोरडी पडणार नाहीत. त्यांची वाढ चांगली होईल.

नखांना नेल स्ट्रेंथनर लावल्याने नखे मजबूत होतात.