ट्रम्प यांचा आणखी एक टॅरिफ बॉम्ब; अमेरिकेबाहेर बनवल्या जाणाऱ्या चित्रपटांवर लादला 100 टक्के कर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी आणखी एक टॅरिफ बॉम्ब टाकला आहे. ट्रम्प यांनी जाहीर केले की, अमेरिकेबाहेर तयार होणाऱ्या प्रत्येक चित्रपटावर आता 100 टक्के कर आकारला जाईल. हा निर्णय चित्रपट उद्योगासाठी धक्कादायक आहे. याचा फक्त फक्त हॉलिवूडच नाही तर, बॉलिवूडलाही बसणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’ वर एक पोस्ट करत हा निर्णय जाहीर केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “इतर देशांनी अमेरिकेचा चित्रपट उद्योग आपल्याकडून हिसकावून घेतला आहे, जसे लहान मुलाकडून मिठाई हिसकावून घेतली जाते.” जर या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर जगभरातील चित्रपट निर्मात्यांसह हिंदुस्थानी चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांवर याचा मोठा परिणाम होईल.

दरम्यान, या आठवड्याच्या सुरुवातीला राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अनेक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात कर लादण्याची घोषणा केली. त्यांनी औषध उत्पादनांवर १०० टक्के सर्वोच्च लादला आणि हे कर अमेरिकेत त्यांचे उत्पादन प्रकल्प उभारणाऱ्या कंपन्यांना लागू होणार नाहीत, असे सांगितले होते.