शिंदे गटाच्या सभेमुळे रामलीला आयोजनासाठी आझाद मैदान नाकारले; रामभक्त म्हणवता आणि परवानगी नाकारता… मंडळाचा थेट फडणवीसांना सवाल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी आझाद मैदानातील जागा रामलीला कार्यक्रमासाठी नाकारल्याचा संतापजनक प्रकार पुढे आला आहे. या प्रकारामुळे रामलीला मंडळाचे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत. सत्ताधारी भाजप महायुतीचे सरकार स्वतःला रामभक्त म्हणवतात आणि सोयीसुविधा देण्यात दुर्लक्ष करतात, असा संतप्त सवाल श्री महाराष्ट्र रामलीला मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.

मुंबईतील रामलीला मैदानाच्या आयोजनाच्या संदर्भात मंडळाचे उपाध्यक्ष संदीप शुक्ला यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज खरमरीत पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे. पण 2023मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय सभेमुळे गेल्या वर्षीही कर्नाटक फुटबॉल मैदानावर रामलीला कार्यक्रम आयोजित करण्यात आला
होता.

अयोध्येतील कलाकार दुर्लक्षित

सत्ताधारी महायुतीने कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासही दुर्लक्ष केले आहे. कोणताही मंत्री किंवा प्रशासनाच्या अधिकाऱयाने सोयीसुविधांबाबत माहिती घेतली नाही. दरम्यान, शिंदे गटाची सभा आता नेस्को सेंटर येथे होणार असल्याचे निश्चित असले तरी आझाद मैदानात रामलीला होणार नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.