‘जानकी’ नावावर आक्षेप; निर्माता हायकोर्टात

high court mumbai

चित्रपटाचे नाव ‘जानकी’ असल्याने चित्रपट मंडळाने आक्षेप घेत यात बदल करण्याची सूचना केली. त्याविरोधात निर्मात्याने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने चित्रपट मंडळाला नोटीस जारी करत याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. हा चित्रपट मूळचा चंदीगडचा आहे. हिंदी भाषेतून तो आता प्रदर्शित होणार आहे. जानकी हे नाव सीतेचे आहे. चित्रपटातील प्रमुख पात्रांची नावे जानकी व रघुराम असल्याने धार्मिक भावना दुखावल्या जातील, असा निष्कर्ष मंडळाने नोंदवला आहे.