असं झालं तर… एसआयपीचे पैसे काढायचे असतील तर…

  • सध्या गुंतवणुकीसाठी एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनला मोठी पसंती मिळत आहे. नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात एसआयपीमध्ये गुंतवणूक करतो.
  • अचानक पैशांची गरज भासते. त्यामुळे एसआयपीमधून पैसे काढावे लागतात. हे पैसे कसे काढायचे हे जाणून घ्या. सर्वात आधी प्लॅटफॉर्मवर लॉग इन करा.
  • एसआयपी गुंतवणुकीतून पैसे काढण्यासाठी म्युच्युअल फंड योजना निवडा. रिडीम पर्यायावर क्लिक करा. किती रक्कम काढायची आहे, ते नमूद करा.
  • आवश्यक तपशील देऊन तुमची रिडेंप्शन रिक्वेस्ट सबमिट करा. एसआयपीमधून पैसे काढण्यासाठी एक्झिट लोड शुल्क लागू होऊ शकते.
  • काही एसआयपीमध्ये तीन वर्षांचा लॉक इन कालावधी असतो. तो संपेपर्यंत पैसे काढता येत नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमच्या ब्रोकरची मदत घेऊ शकता.