रेल कामगार सेनेत ’इनकमिंग’ जोरात, इतर संघटनांच्या कामगारांचा जाहीर प्रवेश

मध्य रेल्वेच्या कामगारांच्या न्याय-हक्कांसाठी लढणाऱ्या रेल कामगार सेनेमध्ये जोरदार ’इनकमिंग’ सुरु आहे. रेल कामगार सेनेचे अध्यक्ष विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस दिवाकर देव (बाबी) यांच्या नेतृत्वाखालील रेल कामगार सेनेच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन इतर संघटनांमधील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी रेल कामगार सेनेत जाहीर प्रवेश केला.

तीव्र दक्षतेने कामगारांची कामे करण्याची पद्धत आणि पारदर्शकता याकडे आकर्षित होऊन रेल कामगार सेनेत अनेक संघटनांमधील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला. यावेळी संयुक्त सरचिटणीस नरेश बुरघाटे, सहकार्याध्यक्ष भारत शर्मा, मुंबई विभाग सचिव तुकाराम कोरडे, कल्याण अध्यक्ष विनायक भालेराव, केंद्रीय उपाध्यक्ष आणि ट्रॅफिक सचिव संतोष देवळेकर यांच्या उपस्थितीत एस अ‍ॅण्ड टी युनिटची स्थापना करण्यात आली.

प्रमुख सल्लागार राजा कराळे यांच्या नेतृत्वाखाली प्रकाश तावरे, विल्सन कड्डेनवार, योगेश पाटणकर, मिथुन चव्हाण, चंदन दुबे, कर्सन म्हात्रे, किशोर धांडे, अक्षय बेंडाळे, ओमप्रकाश शाह, गणेश गोडे, शेखर पेशवे, विकास पाटील, प्रशांत चिकणे, विनोद धुरंधर, राम जगताप, बालकिसन भागडे, गणेश जगताप, सचिन अहिर, मिलिंद कराळे, जाहीर खान, चंद्रभान सिंग, उमेश पाटील, अनिल पंगार, प्रशांत चिकणे, सुनील काजळे, संतोष कालेकर, बाबू कारभारी, गणेश कांबळे, अजय कांबळे आणि महिला आघाडी मीरा पगारे, मीना जाधव, अनिता कवठे, शोभाबाई आदी कामगारांनी रेल कामगार सेनेत जाहीर प्रवेश केल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कल्याण एस अ‍ॅण्ड टी विभागाची स्वतंत्र कार्यकारिणी मंजूर करून जाहीर करण्यात आली.