
माहीम भंडार गल्ली येथील श्री साईनाथ उत्सव मंडळाच्या वतीने 2 ते 9 ऑक्टोबर या कालावधीत श्री साईबाबा पुण्यतिथी महोत्सव आयोजित केला आहे. यानिमित्त धुपारती, हळदीकुंकू, मुलांसाठी स्पर्धा, महिलांचे सुस्वर भजन, सांस्कृतिक कार्यक्रम, श्री साई सच्चरित्र पारायण, भंडारा आणि साईबाबांची भव्य पालखी मिरवणूक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी साईभक्तांनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष, माजी नगरसेवक प्रकाश आयरे यांनी केले आहे.






























































