
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना बंगळुरूमधील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांचा मुलगा प्रियंक खरगे यांनी दिली. वडिलांची प्रकृती स्थिर असून त्यांना पेसमेकर लावण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. गुरुवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल, असे प्रियंक खरगे यांनी सांगितले.






























































