
शिवसेनेचे गटनेते, आमदार भास्कर जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मिंधे गटातील नेते रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली. ”मिंधे गट स्थापन होऊन तीन वर्ष झाली. तीन वर्षात रामदास कदम यांना कधीच कुणी त्यांचे विचार मांडायला, भाषण द्यायला बोलावलं नाही. त्यामुळे अशा मेळाव्यामधून भुंकल्याशिवाय रामदास कदमांसारख्या श्वानांना कुणी किंमत देत नाही”, अशी जोरदार टीका भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर केली.
”नगरसेवकामधून पुढे येत दोन वेळा तू आमदार झालास. त्यामुळे तू मुंबईसाठी काय केलंस ते सांगायला हवं. एकिकडे आम्ही शिवसेनाप्रमुखांचे शिवसैनिक म्हणायचं आणि त्याच शिवसेनाप्रमुखांवर अश्लाघ्य टीका करायच्या अशा पद्धतीचे हे रामदास कदमांसारखे बारदास कदम, छम छम बारवाले, महिलांनी पैसे कमवायचे आणि यांनी उडवायचे ज्याला xxxxx म्हणतात. अशा xxxxx करणाऱ्या माणसांकडून असेच उद्गार अपेक्षित असतात. त्यांच्याकडून चांगलं प्रबोधन, चांगले विचार व्यक्त होत नाही. ज्या शिवसेनेने 32 वर्ष यांना लोकप्रतिनिधी केलं त्याची कृतज्ञता यांच्याकडून व्यक्त होणार नाही कारण ही कृतघ्न माणसं आहेत. रामदास कदम हे शिंदे सेनेचे नेते आहेत. हा पक्ष स्थापन होऊन तीन वर्ष झाली. मात्र या तीन वर्षात कधी कुणी यांना विचार मांडायला बोलावलं आहे का? महाराष्ट्रात कुणीतरी कुठेतरी यांना भाषण द्यायला नेता म्हणून बोलवलं आहे का? त्यामुळे अशा मेळाव्यामधून भुंकल्याशिवाय रामदास कदमांसारख्या श्वानांना कुणी किंमत देत नाही”, असे भास्कर जाधव म्हणाले.
पत्रकारांनी नितेश राणे यांच्याबाबत विचारताच भास्कर जाधव म्हणाले की, रामदास कदमांना मार्गदर्शन करतात ते त्यांचे पिताजी कुठेयत? ते दुसऱ्याला बोलायला लावतात. त्यांचे पिताजी देखील तेच विचारत होते की शिवसेनेने महाराष्ट्रात काय केले? तुम्ही महाराष्ट्रात मंत्री म्हणून, आमदार म्हणून किती वर्ष होतात, विरोधी पक्ष नेता होतात. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असलेला माणून मी काय केलं ते सांगू शकत नाही. उद्धव ठाकरे, शिवसेनेने काय केलं याची मराठी माणसाला जाणीव आहे. मराठी माणसाचा स्वाभिमान, सन्मान हुंकार आणि मुंबईमधला अधिकार प्रस्थापित करण्याचं व टिकून ठेवण्याचं काम हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी केलं आहे. अशा प्रकारची वाह्यात म्हणजे, कामातून गेलेली माणसं, लूत लागलेली माणसं अशांना आम्ही कधी किंमत देत नाही. माझी भाषा त्यांना उत्तम प्रकारे केले. त्यांच्या वर्मावर बसले असेल.”