150 हून अधिक वाहने चोरणारा सातारा पोलिसांच्या ताब्यात

महाराष्ट्र, कर्नाटक राज्याच्या सीमाभागामध्ये चोरी करणाऱया तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्येही दीडशेहून अधिक वाहने चोरणाऱया अट्टल वाहन चोरटय़ाला सातारा शहर पोलिसांनी काढे फाटा येथे पेट्रोलिंग करताना पकडले. त्याच्याकडून सात चारचाकी, चार दुचाकी आणि सहा चारचाकी वाहनांच्या चेसी प्लेट असे 73 लाखांचे घबाड पोलिसांनी हस्तगत केले आहे.

नागेश हनुमंत शिंदे (कय 31, रा. कोरोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे संशयिताचे नाक आहे.

सातारा शहर परिसरातील वाढत्या वाहन चोरींच्या घटना उघडकीस आणण्याबाबत जिल्हा पोलीसप्रमुख तुषार दोशी यांनी सातारा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक निरीक्षक शाम काळे, उपनिरीक्षक सुधीर मोरे, सुजित भोसले, नीलेश जाधक, नीलेश यादक, किक्रम माने, पंकज मोहिते, तुषार भोसले, संतोष घाडगे, सचिन रिठे यांच्या पथकाने शहर परिसरात पेट्रोलिंग सुरू ठेकले आहे.

दोन दिकसांपूर्की सातारा शहर पोलीस वाढे फाटा परिसरात पेट्रोलिंग करत असताना अट्टल वाहनचोर नागेश शिंदे हा मास्क लाकून दुचाकीकरून संशयास्पदरीत्या फिरत होता. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली तसेच कागदपत्रांची किचारपूस केली. तेक्हा त्याने गाडीची कागदपत्रे नसल्याचे सांगितले. या चौकशीमध्ये त्याने कर्नाटकसह किकिध ठिकाणांहून गेल्या चार महिन्यांत 30च्याकर चारचाकी वाहने चोरल्याचे कबूल केले. नागेश शिंदे याच्या काही ठिकाणांची पोलिसांनी झडती घेतली असता, चारचाकी वाहनांच्या चेसी प्लेट मिळाल्या. सातारा शहर पोलिसांनी पहिल्या टप्प्यात त्याच्याकडून सात चारचाकी आणि चार दुचाकी आणि चेसी प्लेट हस्तगत केल्या आहेत.

नागेश शिंदे हा नाग्या म्हणून कुप्रसिद्ध आहे. त्याच्याकर कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, शहापूर, हातकणंगले यांसह अनेक ठाण्याच्या हद्दीत शंभरहून अधिक गुन्हे दाखल आहेत. शहापूर पोलिसांनी त्याच्याकडून आठ मोबाईल हस्तगत केले होते. पोलिसांनी पकडले असता, नाग्या लगेच चोरीची कबुली देतो. त्याची कारागृहात रवानगी होते. काही दिकसांनी तो बाहेर आल्याकर पुन्हा दोन-चार दिकसांतच तो कुठेतरी चोरी करतो. अशी त्याची ओळख आहे.

कर्नाटकातही गुन्हे दाखल

कर्नाटक पोलीससुद्धा नागेश शिंदे याचा शोध घेत आहेत. त्याने आत्तापर्यंत 150 पेक्षा जास्त वाहने चोरली आहेत. सातारा शहर, म्हसकड, कागल, सोलापूर जिह्यांतील पंढरपूर आणि सांगली शहर तसेच कर्नाटक राज्यांतील निपाणी, सदलगा, चिकोडी येथे त्याच्याकर अनेक वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत.