
नाशिकमध्ये 2027मध्ये होणाऱ्या कुंभमेळय़ाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा आयुक्तपदी पिंपरी-चिंचवड पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची नियुक्ती केली आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची बदली नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त म्हणून तर जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे आता नाशिक नवे जिल्हाधिकारीपदी असतील.
राज्य सरकारने आज आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. माणिक गुरसल यांची बदली आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी झाली आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांची बदली प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव म्हणून करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची नेमणूक जळगाव जिल्हाधिकारीपदी, शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक संजय कोलते यांची बदली साखर आयुक्त, तर एमएसआरडीसीचे सहव्यस्थापकीय संचालक मनोज जिंदाल यांची बदली रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी पदी करण्यात आली आहे.