
मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये विषारी कफ सिरपमुळे अनेक लहान मुलांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. या घटनेमुळे सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली असून गोळ्या औषधांवर विश्वास ठेवणे कठीण झाले आहे. हे प्रकरण ताजे असताना आरोग्यासंबंधी आणखी एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
राजस्थानमध्ये अनेक मोठ्या आजारांवरील औषधांच्या नमुन्यांमध्ये त्रुटी असल्याचे आढळून आले. दरम्यान यापैकी हजारो गोळ्या आधीच विकल्या गेल्या आहेत. या नमुन्यांमध्ये अँटीबायोटिक्सपासून ते हृदयविकाराच्या आजारांसह अनेक गंभीर आजारांवर घेतल्या जाणाऱ्या गोळ्यांचा समावेश आहे. ही औषधे मोठ्या प्रमाणात वापरली जातात. त्यामुळे औषधांबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, औषध नियंत्रण कायद्यात अनेक त्रुती आढळून येत आहेत. हा एक प्रकारचा सामान्य लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे. राजस्थानच्या औषध नियंत्रण विभागाच्या तपासणीदरम्यान औषधांच्या नमुन्यांमध्ये त्रुटी असल्याचे समोर आले. तेव्हापासून राजस्थानच्या औषध नियंत्रण विभागाच्या कामकाजाची चौकशी सुरू केली जात आहे. तेथील प्रयोगशाळेत चाचण्या घेतल्या गेल्या आणि सॅम्पलमध्ये त्रुटी असल्याचेही आढळून आले. मात्र यावर कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतला गेला नाही किंवा त्या कंपन्यांवर कोणतीही अॅक्शन घेण्यास विलंब केला जात असल्याचे, आज तक च्या वृत्तात म्हटले आहे. राजस्थानच्या औषध नियंत्रण विभागाच्या मते, शेकडो औषधांचे नमुन्यांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत
या औषधांचे सॅम्पल झाले फेल-
अँटीबायोटिक्स: इमोक्सीसिलन, क्लेवूलेनिक एसिड टैबलेट, सिफ्रोफ्लोक्सासिन, सेफपोडॉक्सिन, सेफट्राइजोन इंजेक्शन च्या सहा बॅचेसच्या चाचणीत त्रुटी आढळल्या. चाचणीपूर्वी मेडिरिच लिमिटेडने 1लाखांपेक्षा जास्त औषधे विकली होती.
स्टिरॉइड: बीटामेथासोनच्या तीन बॅचेसमध्ये त्रुटी आढळल्या. यासंदर्भात 5 डिसेंबर रोजी अहवाल आला होता मात्र तोपर्यंत मेडिवेल बायोटिकने औषधांचे 30 हजार डोस विकले होते.
अँटीअॅलर्जिक्स :लिवोसिट्रोजिन आणि मोंटेलुकास्टच्या चार बॅचेस नमुना चाचणीत अपयशी ठरल्या. याचाही अहवाल 5 डिसेंबर रोजी आला. मात्र तोपर्यंत थेराविन फार्माल्यूसेशन ने 35 हजार औषधे विकली होती.
मधुमेहविरोधी औषधांच्या तीन बॅचेस – ग्लिमिप्राइड आणि पायोग्लीटाजोनच्या 3 बॅचेसमध्ये त्रुटी आढळून आल्या. रिलीफ बायोटेकने 18 हजारहून अधिक औषधे विकली. याव्यतिरिक्त, पेनकिलरच्या तीन बॅचेस – एसीक्लोफिनेक, पेरासिटामॉल या गोळ्यामध्येही त्रुटी आढळल्या. यासंदर्भातील अहवाल 11 डिसेंबर रोजी आला होती, परंतु तोपर्यंत, 20 हजार औषधे आधीच विकली गेली होती.