क्रूरतेचा गाठला कळस, पतीच्या चेहऱ्यावर आधी गरम तेल ओतले नंतर मिरची पावडर टाकली

नवी दिल्लीत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका पत्नीने क्रूरतेचा कळस गाठून आपल्या पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्लीतील आंबेडकर नगरमध्ये राहणाऱ्या महिलेने झोपताना आपल्या पतीच्या चेहऱ्यावर गरम तेल ओतून लाल मिरची पावडरही टाकली. याप्रकरणी महिलेविरोधात तक्रार दाखल झाली असून तपास सुरु करण्यात आला आहे.

दिनेश असे महिलेच्या पतीचे नाव आहे, तिने दिनेश झोपला असताना त्याच्या चेहऱ्यावर गरम तेल ओतून लाल मिरची पावडरही टाकली, त्याच्या किंचाळ्या ऐकून घरमालक धावत आला आणि त्याने त्याला तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला सफदरजंग येथे न्यायसा

ही घटना 2 ऑक्टोबर रोजी घडली होती. दिनेशच्या पत्नीने दोन वर्षापूर्वीही त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती, पण त्यांच्यात समझोता केला होता. पोलिसांनी या प्रकरणाती नोंद करुन तपास सुरु केला आहे.