शांततेच्या नोबेल पुरस्काराची आज घोषणा, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह 338 व्यक्तींना नामांकन

यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध मीच थांबवले आहे, असे 50 वेळा सांगणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह जगभरातील एकूण 338 व्यक्ती आणि अन्य काही संस्थांना यासाठी नामांकन मिळाले आहे. हिंदुस्थानी वेळेनुसार, शुक्रवारी दुपारी अडीच वाजता या पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. 2024 मध्ये शांततेचा पुरस्कार जपानच्या निहोन हिदानक्यो यांना मिळाला होता. 2025 च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी यंदा अनेक दिग्गज नावांचा समावेश आहे.