15 वर्षांच्या बलात्कार पीडितेची शिकण्याची इच्छा, हायकोर्टाची गर्भपातास परवानगी  

15 वर्षांच्या बलात्कार पीडितेने शिकण्याची इच्छा व्यक्त करत उच्च न्यायालयाकडे गर्भपातास परवानगी देण्याची मागणी केली. ही मागणी न्यायालयाने मान्य केली.

ही पीडिता 27 आठवडय़ांची गरोदर आहे. गर्भपातासाठी तिने न्यायालयाचे दार ठोठावले होते. न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. संदेश पाटील यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. जे.जे. रुग्णालयात हा गर्भपात करावा, बाळ जिवंत जन्माला आल्यास त्याची योग्य ती काळजी घ्यावी, असे आदेशही न्यायालयाने सरकारला दिले.

मनोधैर्य योजनेचा लाभ द्या 

पीडितेला मनोधैर्य योजनेची रक्कम लवकरात लवकर द्या. पीडितेवर अत्याचार झाला असल्याने बाळ जन्माला आल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य शासनाची असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.