IND VS WI 2nd Test – यशस्वी जयस्वालची ‘दादा’गिरी; शतक ठोकलं आणि हटके सेलिब्रेशन करत विराट, गांगुलीला मागे टाकलं

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याला दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरुवात झाली आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी यशस्वी जयसावलने आपला क्लास दाखवून दिला आहे. त्याने 145 चेंडूंचा सामना करत आपलं कसोटी कारकिर्दीतलं 7व शतक झळकावलं आहे. सलामीला आलेला केएल राहूल (38) स्वस्तात माघारी परतला. परंतू यशस्वीने साई सुदर्शनच्या सोबतीने संघाचा डाव सावरला.

नाणेफेक जिंकल्यानंतर शुभमन गिलने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा निर्णय फलंदाजांनी योग्य ठरवला आणि सलामीला आलेल्या यशस्वीने संयमी फलंदाजी करत शतक झळकावलं. केएल राहुल स्वस्तात माघारी परतला. वेस्ट इंडिजचा हा आनंत साई सुदर्शनने फार काळ टिकू दिला नाही. यशस्वी सोबतीने त्याने सुद्धा दमदार फलंदाजी केली. त्याने 165 चेंडूंचा सामना करत 12 चौकारांच्या मदतीने 87 धावांची खेळी केली. दोघांनी मिळून संघाला 200 पार नेलं.

यशस्वी जयसवालने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये सर्वात कमी डावांमध्ये 3000 धावांचा टप्पा पार केला आहे. त्याने आपल्या 71 व्या डावामध्ये 3000 धावांचा टप्पा पूर्ण केला असून याबाबतीत त्याने आता विराट कोहली, पॉली उमरागर, शुभमन गिल आणि सौरव गांगुलीला मागे टाकलं आहे. विराट कोहलीने 80 डावांमध्ये, पॉली उमरीगर 79, शुभमन गिल 77 आणि सौरव गांगुलीने 74 डावांमध्ये 3000 धावा केल्या होत्या.

सध्या उभय संघांमध्ये सामना सुरू असून 90 षटकांचा खेळ झाला तेव्हा टीम इंडियाने दोन गड्यांच्या मोबदल्यात 318 धावा केल्या होत्या. यशस्वी (173*) आणि शुभमन गिल (20*) फलंदाजी करत आहेत.