असं झालं तर… विदेशात पासपोर्ट हरवला तर…

1 हिंदुस्थानातील हजारो लोक विदेश भेटीवर जात असतात. परदेश दौऱ्यासाठी पासपोर्ट आणि व्हिसा महत्त्वाचा असतो. तो सांभाळून ठेवणेही तितकेच आवश्यक काम असते.

2 जर परदेशात पासपोर्ट चोरीला गेला किंवा चुपून हरवला तर सर्वात आधी स्थानिक पोलिसांना याची माहिती द्या. हरवल्याची तक्रार करा आणि पोलिसांचा अहवाल घ्या.

3 हिंदुस्थानच्या दूतावासात संपर्प साधा. पासपोर्ट हरवल्याची माहिती त्यांना द्या. हरवल्याचे ठिकाण आणि अन्य सविस्तर माहिती त्यांना देणे आवश्यक आहे.

4 नवीन पासपोर्ट मिळवण्यासाठी तुम्हाला दूतावासाकडे आवश्यक कागदपत्रे सादर करून अर्ज करावा लागेल. त्यानंतर दूतावास तुम्हाला नवीन पासपोर्ट देईल.

5 नवीन पासपोर्ट किंवा आपत्कालीन दस्तऐवज मिळेपर्यंत प्रवास करू शकत नाही. हरवलेला पासपोर्ट पुन्हा वापरण्याचा प्रयत्न केल्यास परदेशात प्रवेश नाकारला जाऊ शकतो.