
लाल शिसे, तांबे ऑक्साईड आणि लिथियम सारख्या प्रतिबंधित रसायनांपासून तयार केलेल्या चिनी फटाक्यांची वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर महसूल गुप्तचर संचाल नालयाने कारवाई केली. या कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी कंटेनरमधील ६ कोटी ३२ लाखांचे २० मेट्रिक टन चिनी फटाक्यांचे ६० हजार बॉक्स जप्त केले.
लेगिंग्जच्या नावाखाली चिनी फटाक्यांची वाहतूक केली जात असल्याची माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाच्या विभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने न्हावा शेवा बंदरात सापळा रचला. यावेळी पथकाने संशयीत कंटेनरची झडती घेतली असता त्यांना कंटेनरमधून ५ टक्के लेगिंग्ज आणि ९५ टक्के हानिकारक चिनी फटाक्यांचा साठा सापडला. त्यानुसार पथकाने हा सर्व मुद्देमाल जप्त केला असून डीआरआयचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.