Ahilyanagar news – भाजप आमदार शिवाजी कर्डीले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

माजी मंत्री आणि राहुरी मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आमदार शिवाजी कर्डीले यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आमदार संग्राम जगताप व माजी महापौर संदीप कोतकर यांचे ते सासरे होते.

शुक्रवारी पहाटे तब्येत त्यांना तत्काळ राहुरी येथील साईदीप हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच सकाळी 8.10 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच राहुरीसह संपूर्ण नगर जिल्ह्यात शोककळा पसरली असून साईदीप हॉस्पिटलसमोर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे.

शिवाजी कर्डीले यांचा जन्म १० जानेवारी १९७० रोजी राहुरी येथे झाला. शिक्षणानंतर त्यांनी शेती आणि दुग्धव्यवसायात काम सुरू केले. नंतरच्या काळात जनसंपर्क वाढवत राजकारणात प्रवेश केला. २००४ मध्ये नगर उत्तरमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि तीन वेळा आमदारकी मिळवली. २०१९ मध्ये त्यांचा पराभव झाला होता, मात्र २०२४ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा विजयश्री खेचून आणली.