
ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांची खुलेआम लाचखोरी, बिल्डरांसाठी जनतेच्या पाण्याची होणारी चोरी, वाहतूककोंडी, बेकायदा बांधकामांची बजबजपुरी, गुंडाराज आणि त्याला असलेला सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा याविरुद्ध शिवसेना आणि मनसेने महामोर्चा काढला होता. या मोर्चाला ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. शिवसेना, मनसेने ठाणे महापालिकेवर काढलेल्या मोर्चात महाविकास आघाडीसह हजारो ठाणेकर उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. त्याचा परिणाम दिसत असून शिवसेना, मनसेच्या महा मोर्चानंतर पालिका आयुक्तांनी पहिला दणका देत वादग्रस्त अधिकारी सचिन बोरसे यांची अखेर बदली केली आहे.
शिवसेना, मनसेच्या महामोर्चानंतर पालिका आयुक्तांनी पहिला दणका देत वादग्रस्त अधिकारी सचिन बोरसे यांची अखेर बदली केली आहे. सचिन बोरसे यांच्याकडून निवडणुक विभाग काढला असून त्यांच्याकडे परवाना विभाग, जनगणना विभाग आणि नागरी सुविधा केंद्राचा पदभार सोपवण्यात आला आहे. तर कार्यालयीन अधीक्षक बाळू पिचड यांच्याकडे निवडणूक विभागाचा पदभार देण्यात आला आहे. शिवसेना, मनसेसह महाविकास आघाडीने बोरसे यांच्या बदलीची मागणी केली होती. आता सचिन बोरसे यांची बदली करण्यात आली आहे.