बोनससाठी कंत्राटी कामगारांचे आज आंदोलन, ‘गांधीगिरी’ पद्धतीने आयुक्तांना निवेदन देणार

मुंबई महानगरपालिकेने ‘कायम’ कर्मचाऱयांना या वर्षी 31 हजार रुपयांचा बोनस दिला असला तरी रोजंदारीवर काम करणारे, बहुउद्देशीय कर्मचारी, आशा सेविका व आरोग्य खात्यात काम करणारे कामगार, नर्स आणि प्लाझ्मा सेंटरमध्ये काम करणाऱयांना कर्मचाऱयांना ‘दिवाळी भेट’ म्हणून मिळणारा बोनस बंद केला आहे. शेकडो कर्मचाऱयांना याचा फटका बसल्याने प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे पालिकेने तातडीने बोनस द्यावा या मागणीसाठी संबंधित कर्मचारी 20 नोव्हेंबर रोजी पालिका मुख्यालयावर धडक आंदोलन करणार आहेत. गांधीगिरी पद्धतीने हे आंदोलन होणार असल्याचे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी सांगितले.

पालिकेने आपल्या सर्व कायम कर्मचाऱयांना, अधिकाऱयांना बोनस दिला आहे, मात्र कंत्राटी तत्त्वावर अगदी तुटपुंज्या पगारावर काम करणाऱया कर्मचाऱयांना ‘दिवाळी भेट’ म्हणून मिळणारा पाच हजारांचा बोनस बंद केला आहे. त्यामुळे कर्मचाऱयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.