महसूल विभागात दिवाळी धमाका, 47 अधिकारी झाले अपर जिल्हाधिकारी

महसूल विभागाने दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आज धमाका केला. गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या बढत्या होलसेलने केल्या. 47 अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी पदी बढती देण्यात आली. त्यासंदर्भातील शासन आदेश आज जारी करण्यात आला. 23 अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) तर 24 उपजिल्हाधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी पदावर बढती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे निवडश्रेणी मिळालेल्या अनेकांचा सनदी सेवेत जाण्याचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा झाला आहे.