एक्सटेंशन बोर्डमध्ये चुकूनही वापरू नका ‘हे’ ५ डिव्हाइस, ठरू शकतात धोकादायक

घरात अनेकदा विजेच्या डिव्हाइससाठी एक्सटेंशन बोर्डचा वापर केला जातो. मात्र काही डिव्हाइस एक्सटेंशन बोर्डवर वापरणे धोकादायक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, खालील पाच डिव्हाइस एक्सटेंशन बोर्डवर लावणे टाळावे, अन्यथा शॉर्ट सर्किट, आग लागणे यासारख्या घटना घडू शकता.

रेफ्रिजरेटर : रेफ्रिजरेटरला जास्त वीज आणि स्थिर व्होल्टेजची गरज असते. एक्सटेंशन बोर्डवर याचा वापर केल्यास बोर्ड गरम होऊन आग लागण्याचा धोका वाढतो.

एअर कंडिशनर (AC): एसीसारखी जास्त वीज खेचणारी उपकरणे एक्सटेंशन बोर्डवर लावल्यास बोर्ड ओव्हरलोड होऊ शकते, ज्यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका निर्माण होतो.

मायक्रोवेव्ह ओव्हन: मायक्रोवेव्हला हाय व्होल्टेजची आवश्यकता असते. एक्सटेंशन बोर्डवर याचा वापर केल्यास बोर्ड जळण्याची किंवा उपकरण खराब होण्याची शक्यता असते.

वॉशिंग मशीन : वॉशिंग मशीनला स्थिर आणि जास्त वीजपुरवठा लागतो. एक्सटेंशन बोर्डवर याचा वापर केल्यास वायरिंगला ताण येऊन आग लागण्याचा धोका वाढतो.

इलेक्ट्रिक हीटर : इलेक्ट्रिक हीटर जास्त वीज वापरते आणि एक्सटेंशन बोर्डवर त्याचा वापर केल्यास बोर्ड जास्त गरम होऊन धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते.