केसनंद गावाच्या यादीत एका घरात 188 नावे! फटाके फोडून मतदार यादीची केली होळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
state election commission maharashtra

पुणे जिह्यातील केसनंद गावामध्ये निवडणूक आयोगाच्या यादीनुसार एका घरामध्ये एकाच जाती-धर्माचे तब्बल 188 लोक राहतात, त्यांचे यादीत नाव आहे. परंतु प्रत्यक्षात असे पुठलेही घर तेथे आढळून आले नाही. याचाच निषेध म्हणून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर फटाके फोडत निवडणूक आयोगाची यादी जाळत दिवाळी साजरी केली.रोहित पवार म्हणाले, 188 लोक राहत असलेल्या घराचा शोध घेऊन या घर क्रमांक 1 या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी माजी आमदार अशोक पवार यांच्यासह आम्ही सर्वजण गेलो असता संबंधित ठिकाणी शोध घेतला. स्थानिक ग्रामपंचायतीकडे आणि स्थानिक नागरिकांकडे चौकशी केली, परंतु असं कोणतंच घर याठिकाणी नसल्याची माहिती देण्यात आली.