
हिंदुस्थानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दोन्ही. दोन्ही उभय संघांमध्ये तीन वन डे सामन्यांची मालिका सुरू असून या मालिकेतील पहिल्या लढतीत हिंदुस्थानचा 7 विकेट्ने पराभव झाला होता. मालिकेतील दुसरा सामना एडलेडच्या ओव्हल मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या लढतीत विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न हिंदुस्थानचा असेल. या लढतीपूर्वी कर्णधार शुभमन गिल ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यावर फिरताना दिसला. यावेळी त्याच्यासोबत पाकिस्तानी चाहत्याने गैरवर्तन केले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिल याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. शुभमन गिल काळ्या रंगाची हुडी घालून ऑस्ट्रेलियातील रस्त्यावर फेरफटकाना मारताना दिसतोय. याचवेळी एक पाकिस्तानी चाहता गिलला थांबवतो आणि त्याच्यासोबत हस्तांदोलन करतो. हस्तांदोलन केल्यानंतर पाकिस्तानी चाहता ‘पाकिस्तान झिंदाबाद’ असे ओरडतो. मात्र यावर गिल कोणतीही प्रतिक्रिया देत नाही आणि तिथून निघून जातो. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठा गदारोळ उडाला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, पहिल्या लढतीत पराभव स्वीकारावा लागल्याने हिंदुस्थानला आजच्या लढतीत विजय अनिवार्य आहे. दुसऱ्या वन डे मध्येही रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहे. पहिल्या लढतीत दोघेही फ्लॉप ठरले होते. विराट शून्यावर तर रोहित शर्मा 8 धावांवर बाद झाला होता.