
45 वर्षांहून अधिक वयाचे तसेच निवृत्त, गृहिणी व वरिष्ठ अधिकारी डिजिटल अटकेचे सर्वाधिक टार्गेट केले जात आहेत. शिवाय एकटे राहणारे व सायबर फसवणुकीपासून अनभिज्ञ असणाऱ्यांची सर्वाधिक फसवणूक होत असल्याचे सायबर पोलिसांकडून सांगण्यात येते.
सीबीआय अधिकारी, पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करत एखाद्या गुह्यात अटक होईल, अशी भीती दाखवत सायबर गुन्हेगार नागरिकांची कोटय़वधी रुपयांची फसवणूक करत आहेत. सायबर भामटे जास्त करून 45 वर्षांहून अधिक वयाचे तसेच निवृत्त, गृहिणी व वरिष्ठ अधिकारी, एकटे राहणारे व सायबर फसवणुकीपासून अनभिज्ञ असणाऱ्यांची आर्थिक फसवणुक करत आहेत. त्यामुळे व्हिडीओ कॉलद्वारे कोणी अटकेची भीती दाखवत असेल तर त्यावर विश्वास न ठेवता त्यांना बळी पडू नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

























































