पीर कमलीशाह बाबा यांचा उरूस उत्साहात, सर्वधर्मीयांसह शिवसेनेकडून चादर अर्पण

चुनाभट्टी येथे हजरत सय्यद पीर कमलीशाह बाबा यांचा 89 वा उरूस उत्सव शुक्रवारी मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले तसेच कव्वालीची जुगलबंदी  ठेवण्यात आली होती. सर्वधर्मीयांसह शिवसेनेकडूनही बाबाच्या दर्ग्यावर चादर अर्पण करण्यात आली.

उरूस उत्सवाचे आयोजन हजरत सय्यद पीर कमलीशाह बाबा ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते. उरूसची ही परंपरा गेली 102 वर्षांपासून  सुरू असून आज बाबाचे वंशज हजरत सय्यद पीर कमलीशाह बाबा व त्यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र हजरत सय्यद पीर ऐनुलाशाह बाबा आणि त्यांचे सुपुत्र सय्यद मुस्तफा जावेद आणि पणतू हजरत सय्यद एहसान जामी बाबा ही परंपरा पुढे चालवत आहेत. ट्रस्टकडून गरजवंत आणि आजारी व्यक्तींना नेहमीच मदत केली जाते.

उरूसदरम्यान खासदार वर्षा गायकवाड, महिला काँग्रेसच्या मुंबई जनरल सेव्रेटरी प्रीती चोंकशी, डिस्ट्रिक प्रेसिडेंट यूथ काँग्रेस निखिल रुपारेल, युवासेना यूथ वाइस प्रेसिडेंट बांद्रा झाकी कुरेशी, सर्वधर्मीयांसह शिवसेनेकडूनही बाबाच्या दर्ग्यावर चादर अर्पण करण्यात आली. यावेळी विभाग क्र. 6 चे विभागप्रमुख सोमनाथ सांगळे, विभाग संघटक मनीषा नलावडे, विधानसभा प्रमुख कमलाकर नाईक, मनीष मोरजकर, स्वीय सहाय्यक रवींद्र म्हात्रे, उपविभागप्रमुख अनंत गांधी, उद्धव कुमठेकर, स्वप्नील येरुणकर, माजी नगरसेविका मनीषा मोरजकर, मोहन तावडे, कल्पना म्हात्रे, वृषाली म्हात्रे, राणी येरुणकर, भास्कर महाडिक, शुभांगी लाडे, राजर्षी पारकर तसेच शाखाप्रमुख प्रकाश साळुंखे, अजय अंबावले, शाखा संघटक संजीवनी पवार, माधवी पाटील, उपशाखाप्रमुख संदीप मंत्री, शरद पाटील, बाबू म्हात्रे, संजय गावडे, स्वप्नील म्हात्रे, गणेश गुरव तसेच सर्व स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

शेवटी हजरत सय्यद एहसान जामी बाबा सध्या जे गादीचे वारसदार आहेत त्यांनी सर्व शिष्यांना व उपस्थितांना आशीर्वाद दिला. हा उरूस उत्सव यशस्वी करण्याकरिता कमलीशाह बाबा ट्रस्टच्या सर्व कमिटी मेंबर्सनी मेहनत घेतली.