
घर की मुर्गी दाल बराबर. सावजी असल्याने बाहेरचा चिकन मसाला चांगला लागतो. पण जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा, त्यांची कदर करा, त्यांना जपा. नाहीतर जेवढय़ा जोराने वरच्या दिशेने जात आहात तितक्याच झपाटय़ाने खाली आपटाल, अशा शब्दांत आयारामांना पायघडय़ा घालण्यावरून पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप नेत्यांचे कान टोचले.
भाजपमध्ये सध्या मोठय़ा प्रमाणात नवीन लोकांचा ओघ आहे. हे चांगले आहे, पण ज्यांनी पक्ष उभा केला, कठीण काळात काम केले त्यांना विसरून चालणार नाही. जुन्या कार्यकर्त्यांच्या निष्ठsचा आणि कष्टांचा आदर ठेवला पाहिजे, अशी भूमिका नितीन गडकरी यांनी कळमेश्वर येथे झालेल्या एका कार्यक्रमात मांडली.


























































