
बॉलीवूडचा किंग शाहरुख खानचा 2 नोव्हेंबरला 60 वा वाढदिवस आहे. या वाढदिवसाआधी शाहरुखने आपल्या चाहत्यांना मोठी दिवाळी भेट दिली आहे. 31 ऑक्टोबरपासून एसआरके फिल्म फेस्टिव्हल सुरू केला जाणार असून हा फेस्टिव्हल 2 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. पीव्हीआर आयनॉक्स सोबत मिळून हा फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. यात शाहरुख खानचे चित्रपट दाखवले जाणार आहेत. अमेरिका, युके, युरोप, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात हे चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित केले जाणार आहेत. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुख खानचे कभी हां कभी ना, दिल से, देवदास, मैं हुं ना, ओम शांती ओम, जवान हे चित्रपट दाखवले जाणार आहेत. हिंदुस्थानातील 30 शहरांतील 75 हून अधिक चित्रपटगृहांत हे चित्रपट दाखवले जातील. शाहरुख 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या डंकी चित्रपटात दिसला होता.





























































